अश्दोद अश्शूरापुढे पडते
आमचा पिता यशयाला सांगतो की गोणपाट आणि चपला काढून तीन वर्षे उघडा आणि अनवाणी चाल. उघडे करून नेल्या जाणाऱ्या बंदिवानांचे हे जिवंत चित्र आहे. त्याचा रोख त्या मित्रराष्ट्रांवरील यहूदाच्या भरवशावर आहे. किनारपट्टीचे लोक विचारतात, आम्ही कसे सुटणार?
20 1ज्या वर्षी अश्शूराचा राजा सर्गोन याने पाठवलेला सेनापती अश्दोदास आला, त्याने अश्दोदावर हल्ला केला आणि ते काबीज केले;
2त्या वेळी आमच्या पित्याने आमोजाचा पुत्र यशया याच्याद्वारे सांगितले, “तुझ्या कमरेचे तरट सोडून टाक आणि पायातील वहाणा काढून टाक.” त्याने तसे केले आणि तो उघडा व अनवाणी चालला. 3मग आमचा पिता म्हणाला, “जसा माझा सेवक यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी चालला, हे मिसर व कूश यांविरुद्ध एक चिन्ह व शकुन आहे, a a v3 कूश हे त्या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे, जो आता सुदान व उत्तर इथिओपिया याने व्यापलेला आहे. 4तसाच अश्शूराचा राजा मिसराच्या बंदिवानांना व कूशाच्या हद्दपार केलेल्यांना, तरुण व वृद्ध यांना, उघडेनागडे, अनवाणी, ढुंगणे उघडी करून घेऊन जाईल—मिसराची लाज उघड करील. 5तेव्हा ते आपली आशा असलेल्या कूशामुळे व आपला अभिमान असलेल्या मिसरामुळे घाबरून जातील व लज्जित होतील. 6त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील लोक म्हणतील, ‘पाहा, आमच्या आशेचे काय झाले! अश्शूराच्या राजापासून सुटका व्हावी म्हणून आम्ही जिकडे मदतीसाठी पळालो होतो, त्याची ही गत! आता आम्ही कसे निसटणार?’”